मूल तालुक्यातील टेकाडी बिटातील घटना
मूल (प्रतिनिधी) : गुरे चराईसाठी घेवुन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना सावली वनपरिक्षेत्रातील टेकाडी येथे आज (ता. 10) रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान घडली. विश्वेश्वर पेंदोर असे वाघाच्या हल्लात जखमी झालेल्या गुराख्याचे नांव आहे. Cowherd injured in tiger attack
मूल तालुक्यातील वनविभागाच्या जंगलात मोठया प्रमाणावर वन्यप्राणी रेलचेल असते, सध्या सततधार पावसामुळे मूल तालुक्यातील टेकाडी येथील गुराखी विश्वेश्वर पेंदोर यांनी जनावरांना घेवुन सावली वनपरिक्षेत्रातील टेकाडी बिटातील कक्ष क्रं. 305 मध्ये चराईसाठी नेले होते, दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने विश्वेश्वर पेंदोर यांच्यावर हल्ला करून जखमी केले. सदर घटनेची माहीती गावकऱ्यांना माहित होताच, नागरीकांनी वनविभाला माहिती दिली. टेकाडी बिटाचे वनरक्षक एस डब्लु शेंडे, आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष तथा सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांनी जखमीना उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.Mul Taluka Tekadi Bit No. Incident of 305
सावली वनविभागचे वनपरिक्षेत्राधिकारी वैभव राजुरकर, क्षेत्र सहाय्यक कोडापे यांनी उपजिल्हा रूग्णालयात जावुन गुराख्याची भेट घेतली.
वन्यजिवांचा वावर असल्याने कोणीही विनापरवानगी जंगलात जावु नये असे आवाहन सावली वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी वैभव राजुरकर यांनी केले आहे.