नवभारत विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
मूल (प्रतिनिधी) : येथील नवभारत विद्यालयात लोकशाहीच्या माध्यमातून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 10 ऑगष्ट रोजी मुख्याध्यापक अशोक झाडे यांच्या नेतृत्वात पार पडली.
वयाचे 18 वर्षे पुर्ण केल्यानंतर मतदानाचा अधिकार सर्वाना लागु होतो, मात्र शालेय जिवन जगत असतानाच मतदानाचा अधिकारी किती अमुल्य आहे हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावे यासठी मतदानाची संपुर्ण प्रक्रिया विद्यार्थ्याना समजावुन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांना बोलून दाखविली आणि ही प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठीची विविध पदे सांगून वर्गस्तरावर निवडणूक घेण्यात आली. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण, आरोग्य ,स्वच्छता, पर्यावरण , क्रीडा, अशी पदे निवडली गेली. सोबतच त्यांना कामे सांगून जबाबदारी देण्यात आली आणि शाळेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व इतर पदासाठी निवडणूक घ्यायची तयारी केली. या पदासाठी विद्यार्थी उमेदवार इच्छुक होते. त्यांना एक दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला. मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे पार पडली.
निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची, शिक्षकांना मदत केव्हा करावी, शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याध्यापक अशोक झाडे यांनी केले. सदर निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी, वर्ग शिक्षक-शिक्षीका, व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी सहकार्य केले.