भद्रावती मोहरम बहूउद्देशिय उत्सव समितीचा पुढाकार
अतुल कोल्हे भद्रावती
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या दोन वर्षानंतर या वर्षी प्रथमच गांधी चौक येथे मोहरम उत्सव सर्वधर्म समभाव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यात ताजे पंजे डोले सवाऱ्या व ख्वाजा संपूर्ण भद्रावती शहरात भ्रमण करून दर्गा व अस्थाण्याला भेट देवून गांधी चौक येथे येत असतात. या वर्षी अनिल भाऊ धानोरकर अध्यक्ष नगर परिषद भद्रावती तथा समिती उपाध्यक्ष व ठाणेदार गोपाल भारती पोलीस स्टेशन भद्रावती यांच्या हस्ते पूजा व प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजू गैनवार माजी नगरसेवक व मोहरम समितीचे सचिव तसेच रब्बानी शेख समितीचे संघटक व सामाजिक कार्यकर्ते, निलेश पाटील नगरसेवक, प्रा. विनोद घोडे समितीचे कोषाद्याक्ष, प्रफुल चटकी नगरसेवक व समितीचे संघटन सचिव, ए पी आय सुधीर वर्मा पोलीस स्टेशन भद्रावती, पी एस आय अमोल तूळजेवार, ये पी आय मुळे इत्यादी मंचावर उपस्थित होते. हा सण देशभर साजरा केला जात असुन मागील कोरोना काळा मुळे मागील वर्षी कार्यक्रम थोडक्यात करण्यात आला होता परंतु राज्य सरकारने परवानगी दिल्या मुळे हा कार्यक्रम भरगच्च थाटामाटात संपन्न झाला. याचे स्वरूप जत्रे मध्ये झाले शहरातील काही विविध सामाजिक संस्था व सामाजिक संघटनांनी लंगर प्रसाद शरबत वितरीत केले. या कार्यक्रमामध्ये सर्व समाजाच्या लोकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाला व्यापारी असोशियन, पत्रकार असोशीयन, ऑटो असोशीयन यांनी सहभाग दर्शविला.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर जट्टलवार, जगण दानव, संजय सिडाम, प्रशांत बदखल, संजय बॅनर्जी, सुभान सौदागर शेख, खेमचंद हरियानी, शेख इसाक, विलास गुंडावार, राकेश कटारे, प्रकाश पापंट्टीवार, शेख खुर्शीद, सलाम शेख, बाशिद शेख इत्यादींनी अथक परिश्रम घेतले