शिंदे-फडणवीस सरकारचे हे आहेत 18 नवे कॅबिनेट मंत्री

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली कॅबीनेट मंत्री पदाची शपथ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर चाळीसाव्या दिवशी झाला आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
भाजपचे 9 तर शिंदे गटाचे 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मंत्रीपदी शपथ घेतलेल्या आमदारांची नावे आणि त्यांचे मतदारसंघ याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे

भाजप
१. राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी, अहमदनगर
२. सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर, चंद्रपूर
३. चंद्रकांत पाटील – कोथरुड, पुणे –
४. विजयकुमार गावित – नंदुरबार
५. गिरीश महाजन – जामनेर, जळगाव
६. सुरेश खाडे – मिरज, सांगली
७. रवींद्र चव्हाण – डोंबिवली, मुंबई
८. अतुल सावे – औरंगाबाद पूर्व
९. मंगलप्रभात लोढा – मुंबई

एकनाथ शिंदे गट
१. गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण
२. दादाजी भुसे – मालेगाव बाह्य, नाशिक
३. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ
४. संदीपान भुमरे – पैठण, जालना
५. उदय सामंत – रत्नागिरी
६. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद
७. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद
८. दीपक केसरकर – सावंतवाडी, सिंधुदुर्ग
९. शंभुराजे देसाई – पाटण, सातारा