तालुक्यात पुन्हा पुराचा धोका ; नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता

अमरावती जिल्ह्यात सततधार पाऊस पडल्यामुळे धरणाचे पुन्हा दरवाजे उघडले
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ; मागील पूरापेक्षा मोठा पुर येण्याची शक्यता

अतुल कोल्हे भद्रावती :
मागील दोन दिवंसापासून धरण क्षेत्रात तसेच सर्वच तालुक्यात झालेल्या सततधार पाऊसामुळे अप्पर वर्धाचे १३ व निम्न वर्धाचे ३१ तसेच बेंबळा प्रकल्पाचे १० व इसापुर प्रकल्पाचे ५ आपत्तीकालिन दरवाजे उघडावे लागले आहे. परिणामी शिरना, कोराडी, वर्धा या नद्यांच्या पाणी पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. धरणक्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. धरणातील वाढत्या पाणीपातळीमुळे शिरना, कोराडी व वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कचे इशारा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्याच्या वरच्या बाजूला म्हणजे अमरावती जिल्ह्यात सततधार पाऊसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे धरण प्रशासनाने आजपासून धरणातुन नदीपात्रात पाणी सोडण्यात सुरुवात केली. त्यामुळे माजरी, माजरी वस्ती, पळसगाव, पाटाळा, राळेगाव, मनगाव, थोराणा या गावात महापूर येण्याची शक्यता आहे. यापूर्वी 18 जुलैला अप्पर वर्धा, लोअर वर्धा, चारगाव , इरई धरणाचे ४० च्या वर दरवाजे उघडण्यात आले होते. अनेक गावे पुराने वेढली गेली. पण नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचा विळखा सैल झाला. मात्र पुन्हा दोन दिवंसापासून धरण क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. यामुळे अप्पर वर्धा, लोअर वर्धा, बेंबळा व इसापुर प्रकल्पाचे एकूण 59 दरवाजे उघडले आहेत. माजरी परिसरात इतरत्रही दोन दिवसात जोरदार पाऊस झाला. यामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. सतत होणा़्या या पावसामुळे अपर वर्धा, निम्न वर्धा,बेंबळा प्रकल्प व इसापुर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा नदी, शिरना नदी, कोराडी नाल्यातील पाण्याची पातळी सतत वाढत आहे. मागील पूरापेक्षा मोठा पुर येण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. . त्यामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.