आमदार मुनगंटीवार यांनी घेतली कॅबीनेट मंत्री पदाची शपथ : मूल मध्ये आनंदोत्सव साजरा

मूल (प्रतिनिधी) : राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर चाळीसाव्या दिवशी झाला आहे. यामध्ये बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागली असुन त्यांना आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंत्री पद आणि गोपनिपयतेची शपथ दिली.

आमदार मुनगंटीवार यांची कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्याने मूल तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला असुन गांधी चौक येथे भाजपाच्या तालुकाध्यक्ष संध्याताई गुरूनुले, शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, मूल नगर पालीकेच्या माजी अध्यक्षा रत्नमाला भोयर, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, अनिल संतोषवार, शहर सरचिटणीस चंद्रकांत आष्टणकर, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, माजी सभापती मिलींद खोब्रागडे, अनिल साखरकर, अजय गोगुलवार, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. किरण कापगते, ओबीसी सेलचे दादाजी येरणे यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

युती शासनाच्या काळात राज्याचे वित्त, नियोजन वनमंत्री राहिलेल्या आमदार मुनगंटीवार यांनी मूल शहराचा चेहरामोहरा बदलवुन टाकलेला आहे, स्मार्ट सिटी म्हणुन ओळख असलेल्या मूल शहराचा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात विकास खुंटलेला होता मात्र आमदार मुनगंटीवार यांनी परत कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याने मूल तालुक्यातील जनतेच्या विकासप्रती आशा पल्लवित झालेल्या आहेत.