अनोळखी व्यक्ती बद्दल माहिती असल्यास पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन
मूल (प्रतिनिधी) : रात्रौच्या वेळेस नागपूर मार्गावरून मूलकडे येत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने 28 जुलै रोजी धडक दिली, यात तो जखमी झालं, पोलीसांनी त्याला मूल येथे उपचारार्थ दाखल केले मात्र गंभीर दुखापत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारार्थ चंद्रपूर रेफर करण्यात आले, दरम्यान 3 ऑगष्ट रोजी सदर इसमावर उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले, सदर अनोळखी व्यक्तीबद्दल माहिती असल्यास मूल पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन मूल पोलीस स्टेशन कडुन करण्यात आले आहे.
नागपूर मार्गावरून 28 जुलै रोजी मानसिक रूग्ण असल्या सारखा दिसणारा, 5 फुट 5 इंच उंच असलेला अनोळखी इसम मूलकडे अंधारात येत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली, यात तो जखमी झाला होता, त्याला मूल पोलीसांनी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते, प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रेफर करण्यात आले, दरम्यान चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात उपचार घेत असताना 3 ऑगष्ट रोजी निधन झाले, अंदाजे 65 वर्षे असलेला अनोळखी इसमाचे केस व दाळी सफेद असुन शर्ट फाटलेला आहे, सदर अनोळखी इसमाबाबत माहिती असल्यास तात्काळ मूल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आत्माराम गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर प्रकरणाचा तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आत्माराम गायकवाड करीत आहे.