महागाई कमी करा म्हणून काँग्रेसचा आक्रोश

काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती : बल्लारपुरात केंद्र सरकार विरोधात धरणे आंदोलन

अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर
केंद्र सरकार सामान्य जनतेच्या जीवावर उठले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वांना महागाईची झळ पोहचली आहे. महागाईच्या भस्मसुरात सामान्य जनता होरपळली जात आहे. परिणामी सामान्य माणूस महागाईने जर्जर झाला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा हा परिणाम असून आकाशाला भिडलेली महागाई पासून सामान्य जनतेची सुटका करावी, म्हणून केंद्र सरकार विरोधात बल्लारपूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी बल्लारपुरात नगरपालिका चौकात धरणे आंदोलन करून आक्रोश केला.

यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन करून गॅस, पेट्रोल व डिझेलचे वाढलेले दर कमी करण्यात यावे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरुण वर्ग हवालदिल झाला आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी शासकीय नोकर भरती तातडीने करावी. जीवनावश्यक वस्तूचे वाढलेले दर कमी करावे. वीज दरात मोठी वाढ करून वीज ग्राहकाचे कंबरडे मोढले आहे. वीज दर वाढ कमी करा. संरक्षण यंत्रणा कमकुवत करण्यासाठी अग्निपथ योजनेच्या माध्यमातून अग्निवीर भरती योजना रद्द करा. बल्लारपूर तालुका अतिवृष्टीने बेजार झाले असून ओला दुष्काळ जाहीर करा. आदी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी धरणे आंदोलनात बल्लारपूर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, शहर अध्यक्ष अब्दुल करीम, महिला अध्यक्ष अफसाना सय्यद, महिला शहर अध्यक्ष मेघा भाले, माजी न. प. गट नेता देवेंद्र आर्य, ताहेर अली, भास्कर माकोडे, नरसिंग रेब्बावार, आनंद विरय्या, राजेश नक्कावार, रेखा रामटेके, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, रजिता बानो, शोभा मंहतो, मिना बहुरिया, अनिल खरतड, राजू बहुरिया, मुकदर सय्यद, विनोद आत्राम, रवि मातंगी, पवन मेश्राम, खुशाल कोरडे, आकाशकांत दुर्गे, प्राणेश अमराज, दौलत बुंदेल, कासीम शेख, सतीश करमणकर, हरीश तोटावार, कैलास धानोरकर, गोविंदा उपरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन आक्रोश आंदोलन यशस्वी केले.