आरोग्य यंत्रणा लागली कामाला
मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील उथळपेठ येथे मागील काही दिवसापासुन तापाची साथ असल्याने उथळपेठ येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्याची मागणी मूल पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षा लोनबले यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समिर थेरे यांच्याकडे केली होती. मागणीवरून शुक्रवारी आरोग्य विभागाचे पथक उथळपेठ येथे जावुन रूग्णांची तपासणी केले.
मूल पासुन 16 किमी अंतरावर असलेल्या उथळपेठ येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी करोडो रूपयाची निधी आणुन मोठया प्रमाणावर विकासकामे केले आहे. गावात रस्ते, नाल्याचेही कामे जवळपास पुर्ण झालेले असतानाही मागील काही दिवसापासुन उथळपेठ येथे तापाची साथ असुन अनेक रूग्ण यागावात आहेत, मात्र आरोग्य विभागाने लक्ष न दिल्याने मूल पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षा लोनबले यांनी आरोग्य विभागाकडे उथळपेठ येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजनाची मागणी केली, आरोग्य विभागानेही तात्काळ उथळपेठ येथे आरोग्य पथक पाठवुन रूग्णांची आरोग्य तपासणी केली. यामुळे उथळपेठच्या नागरीकांनी समाधान व्यक्त केला.
तापाची साथ नाही तर वातावरण बदलामुळे वायरल आहे: डॉ. खोब्रागडे
मूल तालुक्यातील उथळपेठ येथे तापाची साथ असल्याची माहिती मिळाली होती, यावरून आरोग्य पथक उथळपेठ येथे दाखल होवुन रूग्णांची तपासणी केली असता त्याठिकाणी तापाची साथ नसुन वातावरण बदलामुळे वायरल असल्याची प्रतिक्रिया चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुमेध खोब्रागडे यांनी दे धक्का एक्सप्रेसला दिली.