केवळ मुख्य मार्गावरच बॅनर, होल्डींग लावणार, नगर पालीकेने सादर केले होते प्रतिज्ञापत्र
मूल (प्रतिनिधी) : शहरात वेगवेगळया ठिकाणी बॅनर लावल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे, याविरूध्द मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, याचिकेवरून मूल नगर पालीकेने मुंबई उच्च न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून मूल शहरातील मुख्य चौक आणि मुख्य रस्त्याच्या कडेला बॅनर व पोस्टर लावण्याची परवानगी देण्यात येईल असे नमुद केले आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासुन मूल शहरातील वेगवेगळया ठिकाणी बॅनर लावण्यात येत आहे, यामुळे मूल नगर पालीकेने न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे विसरले की, चक्क न्यायालयाचाच अवमान करीत आहे, अशी चर्चा सध्या मूल शहरात सुरू आहे.
महाराष्ट्र विदृपीकरण प्रतिबंध कायदा 1995 च्या अमलबजावणीच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने 6 ऑगष्ट 2014 रोजी दिलेल्या निर्देशानुसार मूल नगर पालीकेचे तत्कालीन मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांनी 8 नोव्हेंबर 2014 रोजी न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, सदर प्रतिज्ञापत्रात मूल नगर पालीका क्षेत्रात जाहिरातीसाठी पुर्व परवानगी आणि जाहिरातकर भरल्याशिवाय जाहिरात प्रसिध्द होणार नाही, याबाबत काटेकोरपणे दक्षता घेण्यात आलेली आहे. नगर परिषद स्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या जागेवर जाहिरात प्रसिध्दीकरीता नगर परिषद कार्यालयाकडुन पुर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचेे नमुद केले आहे.
सदर जाहिरात प्रसिध्द करताना परवानगीचा क्रंमांक व दिनांक, जाहिरातीचा कालावधी, जाहिरातीचे ठिकाण, आणि शासकीय मालमत्तेवर बॅनर, पोस्टर लावण्याची बंदी घालण्यात आलेली आहे, सदर नियमानुसार बॅनर, पोस्टर दिसुन न आल्यास बेायदेशिर जाहिरात समजुन कायदेशिर कारवाई करण्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे मात्र मूल शहरातुन फेरफटका मारल्यास अनेक बॅनर व पोष्टर शासकीय मालमत्तेवर दिसुन येत आहे,
मूल नगर पालीकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शहरातील मुख्य चौक व मुख्य रस्त्याच्या कडेला बॅनर व पोस्टर लावण्याची परवानगी आहे, याव्यतिरीक्त इतर ठिकाणी फोल्डींग, बॅनर, पोस्टर बोर्ड, स्वागत गेट, तोरण, झेंडा आढळुन आल्यास तात्काळ काढुन टाकण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती,
नियमानुसारच बॅनर लावण्याची परवानगी देवु : मुख्याधिकारी मनिषा वझाळे
महाराष्ट्र विदृपीकरण कायदा 1995 ची अमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नगर पालीकेने नागरीकांसाठी टोल फि क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे, यामुळे नागरीकांनी जाहिरात प्रसिध्द करीत असताना नगर पालीकेची परवानगी घेवुनच प्रसिध्द करावी, परवानगी न घेता लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर काढुन टाकण्यात येणार असुन नियमानुसारच बॅनर लावण्याची परवानगी देवु अशी प्रतिक्रिया मूल नगर पालीकेच्या मुख्याधिकारी मनिषा वझाळे यांनी दे धक्का एक्सप्रेसशी बोलताना दिली.
पुढील भागात नगर पालीकेच्या महसुलावर पाणी