पत्रकार गुरूदास गुरनुले यांना मातृशोक

मूल (प्रतिनिधी): मूल तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, क्रांती ज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष, माळी महासंघाचे विदर्भ सचिव, दै. देशोन्नती व महाविदर्भचे तालुका प्रतिनिधी गुरूदास गुरनुले यांच्या मातोश्री श्रीमती यमुनाबाई दादाजी गुरनुले यांचे आज 26 जुलेै रोजी दुपारी ११.४५ वाजता दरम्यान निधन झाले.

त्यांच्यावर येथील उमा नदीच्या पात्रात दुपारी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. श्रीमती यमुनाबाई गुरनुले यांच्या पश्चात मुल, मुली, सुना,  नातवंड आणि मोठा आप्तपरिवार आहे.