गोंदिया – बल्लारपूर रेल्वे लाईनवरील घटना : तरुण शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूने हळहळ
अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर
रिपरिप पाऊस सुरु असल्याने तो शेताची पाहणी करण्यासाठी शेतशिवारात गेला. दरम्यान गोंदिया – रेल्वे लाईन मार्गाने घराकडे येत असताना एका मालगाडीने पोल क्रमांक ८८४/१७ सी ते ८८५/१ सी दरम्यान मागून जबरदस्त धडक दिली. या धडकेत तो जागीच ठार झाला. ही घटना विसापूर रेल्वे पुलाजवळ सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. Incident on Gondia – Ballarpur railway line ईश्वर सुरेश गिरडकर ( ४५) रा. विसापूर ता. बल्लारपूर असे रेल्वेच्या धडकीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. death त्याच्या अकाली अपघाती मृत्यूने हळहळ वक्त केली जात आहे. accident
त्याच्या पश्च्यात भाऊ, पत्नी व दोन लहान मुले आहे. ईश्वर गिरडकर कडे भिवकुंड परिसरातील रेल्वे लाईन भागाकडे वडिलोपार्जित शेत जमीन होती. पुराने शेतीचे नुकसान झाले का व रिपरिप पावसाने शेतात पाणी साचून आहे काय, म्हणून तो शेताची पाहणी करण्यासाठी शेतशिवारात सकाळी १० वाजता दरम्यान गेला. शेताची पाहणी त्याने केली. काही वेळ तो शेतात थांबला. नंतर गोंदिया – बल्लारपूर रेल्वे मार्गाने घराकडे येण्यास निघाला. आपल्या विचारचक्रात घराकडे येताना मालगाडी काळ म्हणून धडधड करत आली. मागून जबरदस्त मालगाडीने जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याला दिली. पोलीस कर्मचारी बाबा डोमकावळे व सहकार्यानी घटनेचा पंचनामा करून त्याचे प्रेत उतरीय तपासणीसाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. घटनेचा अधिक तपास चंद्रपूर शहर पोलीस करत आहे.