तालुक्यात अतिवृष्टीने ५० वर घरांची पडझड

अनेकांचा निवारा हिरावल्याने संसार उघड्यावर : मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

विसापूर ( प्रतिनिधी) :  बल्लारपूर तालुक्यात मागील तीन दिवसापासून सततधार पाऊस होत आहे. सरासरीच्या तुलनेत ५० टक्केच्या आसपास प्रजन्यमान झाले आहे. या पावसामुळे बल्लारपूर शहरासह ग्रामीण भागातील ५० वर घरांची पडझड झाली असून अनेकांचा निवारा हिरवला गेला आहे. यामुळे गरिबांचे संसार उघड्यावर आले आहे. बल्लारपूर तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

बल्लारपूर शहरात अतिवृष्टीने विविध वार्डात १० जणांच्या घरांची पडझड झाली.ग्रामीण भागात विसापूर येथे १० कुटुंबाच्या घरांची पडझड झाली आहे. यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आली आहे.बामणी ( दुधोली )येथे २, चारवट येथे ५, नांदगाव ( पोडे ) ५, कोठारी येथे १०, मानोरा येथे ३, इटोली येथे २ तर गिलबिली ग्रामपंचायत हद्दीत ३ जणांचे घरे अतिवृष्टीने पडल्याची माहिती आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून बल्लारपूर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र मागील तीन दिवसापासून जलधारा चांगल्याच बरसल्या. अतिवृष्टीने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. गावागावातील तलाव भरले आहे. अतिवृष्टीने तालुक्यात ५० वर घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. काहींचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घरांच्या पडझडीचा आकडा वाढण्याची शक्यता असून शासनस्तरावर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची तजवीज करावी, असी मागणी नागरिकांनी केली आहे.

बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात मागील तीन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीने जवळपास ५० वर घरांची पडझड झाली आहे. काहींच्या घरांचे अंशता नुकसान झाले, तर काहींचे निवारा हिरवला आहे. तलाठ्यामार्फत नुकसान ग्रस्थाचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे. पात्र नुकसान ग्रस्ताना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे.
– संजय राईचंवार
तहसीलदार, बल्लारपूर. 

घरे पडलेल्याना पंतप्रधान योजनेतून घरकुल द्या
बल्लारपूर तालुक्यातील अतिवृष्टी ने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे.त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. कोरोना काळाने आधीच हाल झाले आहे. पावसात ज्यांची घरे पडली. त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. अशांना शासनाने पंतप्रधान घरकुल योजनेतून घराचा लाभ द्यावा. निवारा हिरवलेल्याना अग्रक्रमाने शासकीय घरकुल योजनेचा लाभ देऊन, दिलासा द्यावा.
अनेकश्वर मेश्राम
उपसरपंच, ग्रामपंचायत विसापूर.