रिमझीम आला तरी रस्ता होतोय बंद : 1 किमीसाठी 12 किमीचा रस्ता करावा लागतो पार

विद्यार्थी आणि नागरीकांना होता मनस्ताप

सावली (प्रतिनिधी) : तालुका मुख्यालयापासून अवघ्या 1 किमी अंतररावर असलेल्या चारगाव येथील उमा नंदी वरून नेहमीच पाणी वाहत असते, रिमझीम आला तरी हा मार्ग बंद होत असल्याने नागरीकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सावली तालुक्यातील चारगांव हे गांव मुख्यालयापासुन केवळ 3 किमी अंतरावर आहे, सावली वरून जाताना यामार्गावर उमा नंदीचे पुल आहे, अतिशय कमी उंचीवर हे पुल असल्यामुळे दरवर्षीच यामार्गावरील वाहतुक बंद होत असते, साधा रिमझीत पाऊस आला तरी हा मार्ग बंद होत असल्याने नागरीकाना चारगांव येथे जाण्यासाठी टेकाडी अथवा पांढरसराड मार्गाने जावे लागत आहे. यासाठी जवळपास 12 किमी अंतरावरून प्रवास करीत जावे लागते. महाविकास आघाडी सरकार मधील मदत व पुर्नवसन मंत्री राहिलेल्या आमदार विजय वडेट्टीवार यांचा हा निर्वाचन क्षेत्र आहे हे विशेष.

तालुक्यातील चारगाव ,भारपायली, सादगाड ,मानंकापूर, चक्रमांकापूर व मेटेगाव येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सावली येथेच यावे लागते, मात्र पावसाळ्यात या मार्गावरून नेहमीच विद्यार्थी आणि नागरीकांना वेढा टाकून 12 किमी अंतर कापून यावे लागत असल्याने सदर नदीवरील पुलांची उंची वाढविण्याची मागणी केली जात आहे, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सदर मागणी पुर्ण होणार अशी आाशा तालुका वासीयांना होती मात्र अजुनही पुलाची मागणी पुर्ण न झल्याने नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.