इमारत झाली, आता घंटा कधी वाजणार

मूल नगर पालीका प्रशासन लक्ष देईल का?

मूल (प्रतिनिधी) : नगर पालीका क्षेत्रातील मुलाना शिक्षण घेता यावे यासाठी नगर पालीकेने करोडो रूपये खर्च करून भव्यदिव्य इमारत उभी केली मात्र 9 महिणे झाले उद्घाटन होवुन परंतु अजुनही शैक्षणिक सत्र सुरू करण्याकडे नगर पालीका प्रशासन लक्ष दिलेले नाही यामुळे इमारत झाली पण घंटा कधी वाजणार असा सवाल नागरीक करीत आहे.

मूल नगर पालीका क्षेत्रातील स्वामी विवेकानंद विद्या मंदीराच्या बाजुला मूल नगर पालीकेने सुमारे पावणे पाच कोठी रूपये खर्च करून मॉर्डन शाळेची भव्यदिव्य इमारत उभी केली आहे, गेल्या वर्षीच याइमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पुर्ण करून नगर पालीकेकडे सुपुर्द केले, सदर इमारतीचे उद्घाटन माजी अर्थमंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, तत्कालीन उपाध्यक्ष नंदु रणदिवे यांच्या उपस्थितीत 30 ऑक्टोंबर 2021 रोजी पार पडले, आता जवळपास वर्षे होत असतानाही सदर इमारत धुळखात आहे मात्र नगर पालीका याकडे दुर्लक्ष करीत आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी क्षेत्राचे आमदार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मॉर्डन स्कुलच्या इमारत बांधकामासाठी वैशिष्यपुर्ण योनजेतुन करोडो रूपयाचा निधी मंजुर केले होते, सध्या याठिकाणी भव्य इमारत उभी असतानाही ज्या उद्देशाने इमारत बांधण्यात आली तो उद्देश अजुनही सफल होत नसल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आवश्यक सुविधा पुर्ण होताच शाळा सुरू करू : मुख्याधिकारी मंनिषा वंजाळे
मूल नगर पालीका क्षेत्रातील मॉर्डन स्कुलची इमारत तयार आहे, मात्र शाळेसाठी आवश्यक असलेले बेंचेस, टेबल आणि इतरही सुविधेसाठी शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे, निधी मंजुर होवुन काम पुर्ण झाल्यास येणाऱ्या सत्रात शाळा सुरू करू अशी प्रतिक्रिया मूल नगर पालीकेच्या मुख्याधिकारी मनिषा वजाळे यांनी दे धक्का एक्सप्रेसला दिली.

प्रशासनातील निष्काळजीपणा कारणीभुत : राकेश रत्नावार
करोडो रूपये खर्च करून मूल नगर पालीकेने मॉर्डन स्कुलची इमारत तयार केली आहे मात्र अजुनही शाळा सुरू करण्यात आलेली नाही, याला सर्वस्वी प्रशासन आणि तत्कालीन लोकप्रतिनिधी कारणीभुत असल्याची प्रतिक्रिया मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी दिली.