डेंगुचा संभाव्य उगमस्थान असलेल्या खाली भुखंडावरील कचऱ्याचा नायनाट करण्यास नगर पालीका अपयशी

नगर पालीकेने दिले 17 खाली भुखंड धारकांना नोटीस

मूल (प्रतिनिधी) : अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या मूल नगर पालीका क्षेत्रात डेंगुचे रूग्ण निघायला सुरूवात झालेली आहे, परंतु नगर पालीका अजुनही डेंगुचे उगमस्थान असलेल्या खाली भुखंडावरील केरकचरा काढण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात रूग्णांमध्ये भरमसाठ वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मूल नगर पालीका क्षेत्रात अनेकांनी गुंतवणुक म्हणुन केवळ भुखंड घेवुन ठेवलेले आहे, तर अनेकांनी भुखंड घेवुन ठेवले मात्र अजुनही बांधकाम केलेले नाही, यामुळे अनेक खाजगी भुखंडामध्ये केरकचरा दिसुन येत आहे, मागील काही दिवसांपासुन पावसाला सुरूवात झालेली आहे, यामुळे अनेक भुखंडावर पाणी जमा होवुन आहे, जमा झालेल्या पाण्यावर डेंगुचे डास तयार होवुन डेंगुचा पादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही

मूल शहरातील ताडाळा मार्गावर राहणाऱ्या शाळकरी युवतीला डेंगु झाल्याचे निदान पॅथालाजी मधुन आलेल्या अहवालावरून सिध्द झाले आहे. पावसाळयात ताप, सर्दी, खोकल्याचे रूग्ण मोठया संख्येने आढळुन येतात, रूग्णमध्ये वाढ होणार नाही यादृष्टीने नगर पालीकेने शहरात असलेल्या खाली भुखंडावरील केरकचरा, झाडे झुडपे, आणि पाण्याचे डपके पुर्णपणे काढण्यात यावे, काही दिवसापुर्वी खाली भुखंडावर झाडेझुडपे असलेल्या धारकावर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आवाहन केले मात्र सदर आवाहन केवळ कागदोपत्रीच काय? असा सवाल नागरीक करीत आहे.

खाली असलेल्या भुखंड धारकांना नोटीस देवुन भुखंड स्वच्छ करण्यास भाग पाडु : अभय चेपूरवार
मूल नगर पालीका क्षेत्रात असलेल्या खाली भुखंडावर झाडेझुडपे वाढुन डबके तयार होणार नाही यासाठी मोहिम राबविण्यात आली होती, सदर मोहीमेअंतर्गत 17 भुखंड धारकांना नोटीस दिली त्यापैकी 4 भुखंड स्वच्छ केले उर्वरीत भुखंड धारक अजुनही केले नाही, नगर पालीकेने सर्व भुखंडधारकाना नोटीस देवुुन भुखंड स्व्च्छ करण्यास भाग पाडु अशी प्रतिक्रीया मूल नगर पालीकेचे आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार यांनी दिली.

नगर पालीकेचे नागरीकांना आवाहन
डेंग्यू मलेरियाचे डास अळी घरातील स्वच्छ पाण्यात कुलर, फुटके माठ, टायर, झाडाचे कुंडीतील पाण्यात तयार होतात, सदर अळीचा उगम होवु नये यासाठी उद्या पासून  4 पथकाद्वारे  घरोघरी तपासणी करण्यात येणार आहे, नागरीकांनी आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा व घरी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे असे आवाहन मूल नगर पालीकेने केले आहे