दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

दुचाकी अनियंत्रीत झाल्याने घडला अपघात : नांदगाव (पोडे) – विसापूर मार्गांवर पुलाजवळील घटना

विसापूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील वेकोलि वसाहतीतून दुचाकीने विसापूर मार्गे बल्लारपूर कडे जात होता. मात्र त्याची दुचाकी अनियंत्रित झाल्याने विसापूर जवळील हनुमान मंदिर जवळच्या पुलाला जबरदस्त धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला Accident ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता नांदगाव ( पोडे )- विसापूर मार्गांवर घडली. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव हेमंत राजन्ना पत्तीवर ( वय -२७) रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर असे नाव आहे. Death

हेमंत पत्तीवर हा तरुण काही कामानिमित्त नांदगाव (पोडे ) येथे गेला.वेकोलि वसाहतीतून तो दुचाकी क्रमांक एम. एच.३४- बी. एक्स.२२८८ ने विसापूर मार्गाने बल्लारपूर कडे जात होता.दरम्यान हेमंत चे दुचाकी वरून नियंत्रण सुटले. त्याने विसापूर जवळील हनुमान मंदिर जवळच्या पुलाला जबरदस्त धडक दिली.  Nandgaon (Pode) – Incident near bridge on Visapur road या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. अपघातात गंभीर हेमंत च्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती विसापूर औट पोलीस चौकीचे जमादार जीवन पाल व शिवराज वाघमारे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. हेमंत पत्तीवर हे वेकोलि बल्लारपूर येथे कार्यरत असून बल्लारपूर च्या वेकोलि च्या वसाहतीत राहत असल्याची माहिती आहे. ज्या दुचाकीने हेमंत चा अपघात झाला. ती दुचाकी नांदगाव (पोडे ) वेकोलि वसाहतीत राहणारे दत्ता वाघमारे यांची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हेमंत पत्तीवर हे नांदगाव (पोडे )येथे कोणत्या कामासाठी गेले होते. हे मात्र कळू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद रास्कर हे करत आहे.