78 गोवंश जनावरासह दोन ट्रक सावली पोलीसांनी केले जप्त
सावली (प्रतिनिधी) : साठवण क्षमतेपेक्षाही जास्त गोवंश जनावरे ट्रक मध्ये साठवुन वाहतुक करीत असताना सावली पोलीसांनी 2 ट्रक मधुन सुमारे 78 गोवंश जनावराची सुटका केली असुन दोन ट्रक पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. Police rescued about 78 cattle from 2 trucks सदर प्रकरणामध्ये 4 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. Crimes against 4 accused
मूल-सावली तालुक्यातुन मोठया प्रमाणावर गोवंश जनावरांची वाहतुक होत असल्याची चर्चा आहे, याबाबत दे धक्का एक्सप्रेस मध्ये वारंवार वृत्त प्रकाशित केले होते, दरम्यान सावली पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सावली टाऊन मध्ये केलेल्या नाकाबंदीत बुधवारी गडचिरोली दिशेकडुन येणारे टाटा कंपनीचे ट्रक क्रं. एम एच 04 सी यु 9295 व सीजी 24 एस 2672 या वाहनाची तपासणी केली असता त्याठिकाणी 78 गोवंश जनावरांना निर्दयतेने, कुरपणे तोंडाला मोरके व दोराने पाय बांधुन कोंबुन नेत असताना सावली पोलीसांनी सदर जनावरांची सुटका केली आहे. The police have released 78 cows while they were being ruthlessly tied to their legs with a rope. सदर वाहनाची किंमत 20 लाख तर जनावरांची किंमत 7 लाख 80 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. Illegal transportation of cattle by truck
सदर जनावरांची वाहतुक करणाÚया अब्दुल राजीक अब्दुल रफीक वय 36 वर्ष, मो. अस्लम मो. आजम वय 34 वर्ष, रेहनुधीन फकरुद्दीन वय 25 वर्ष सर्व रा. सर्व मुर्तीजापूर जि. अकोला व ट्रक क्रं. सी जी 24 एस 2672 चे चालकाविरूघ्द महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम 5 (अ), (ब), प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 डी, एफ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119, मोटरवाहन अधिनियम कलम 83ध्177 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई प्रभारी पोलीस अधिक्षक माखनिकर , प्रभारी अपर पोलीस अधिक्षक शेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दर्शन लाटकर, विशाल दुर्योधन, पो.का धिरज पिदुरकर चालक पुनेश्वर कुळमेथे यांनी केली.