रूग्णाला घेवुन जाणाऱ्या वाहनाचा अपघात

गट्टुच्या ढिगाऱ्यावर अडकली स्कॉर्पिओ

सिंदेवाही (प्रतिनिधी): रूग्णाला घेवुन सिंदेवाहीकडे जात असलेल्या स्कार्पिओ व टॅªक्टरची समोरासमोर धडक झाल्याने काही जण जखमी झाल्याची घटना मेंढा माल जवळ झाली..

प्राप्त माहितीनुसार ब्रह्मपुरी येथून रुग्णांना सिंदेवाही येथे आणत असताना महिंद्रा स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच 34 के 3000 या वाहनाची महिंद्रा ट्रॅक्टर एम एच 34 बी आर 4308 या क्रमांकाचे वाहनाला धडक दिली .दोन वाहनाच्या समोरासोमोर धडक झाल्याने महामार्गाचे रस्त्यावरील कामाचे गट्टू असलेल्या ढिगारा ला जाऊन महिंद्रा स्कॉर्पिओ अडकली होती. ट्रॅक्टर चालक जखमी झाले व इतर किरकोळ जखमी झाली आहेत .

सदर अपघातातील धडक झालेले वाहन मेंढा माल येथून जेसीबीच्या सहाय्याने पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेले आहे . अपघाताचा पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहे.