मूल (प्रतिनिधी) : चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सभा ब्रम्हपुरी येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेला डाँ.राजाभाऊ खोब्रागडे शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेश कांबळे, संघटनेचे महासचिव अरूण जुनघरे, कोषाध्यक्ष शशीकांत माडे, कार्याध्यक्ष लोमेश दरडे, सल्लागार रामचंद्र निखाडे आणि विजय जांभुळकर आदि उपस्थित होते.
प्रारंभी डाँ. राजेश कांबळे यांचे हस्ते महामानव महात्मा ज्योतीबा फुले आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन आणि दिप प्रज्वलन करण्यात आले. सभेत ठराविक विषयावर चर्चा होण्यापुर्वी महासचिव अरूण जनुघरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सभेत आश्वासीत प्रगती योजना आणि सातव्या वेतन आयोगासंबंधी कृती समितीने केलेला पाठपुरावा आणि सध्याची स्थिती, शैक्षणिक सञ २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये संघटनेशी संलग्नीत कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्याच्या सत्कार आयोजनाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. याशिवाय सहसंचालक कार्यालय आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचेशी संलग्नीत प्रश्नांवर विचार विनीमय करण्यात आला.
सभेचे संचलन डाँ. धम्मपाल फुलझेले यांनी केले. विदर्भ संघटनेचे उपाध्यक्ष रूपेश चिंचोळे यांनी आभार मानले. सभेला महासंघाचे कार्याध्यक्ष गजानन काळे, विदर्भ सचिव हुमेश काशीवार, संघटक विनोद चोपावार, महासंघ प्रतिनिधी विशाल गौरकार, चंद्रकांत खोके यांचेसह जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी अधिक्षक तथा कृती समितीचे समन्वयक राममोहन ब्राडीय, मुख्य लिपीक अजय देशपांडे, वरीष्ठ लिपीक सुखदास येसनसुरे, समीर मेश्राम आणि ग्रंथपाल परीचर हर्षाली सिंगाडे यांनी सहकार्य केले.