सावली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
सावली (प्रतिनिधी) : परिसरातुन जनावरांची अवैध वाहतुक करीत असल्याच्या माहितीवरून सावली पोलीसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये 16 गोवंश आणि 4 म्हैस वर्षीय जनावराना आयशर ट्रकमधुन वाहतुक करताना पकडण्यात आले असुन जनावरांची सुटका करण्यात आली. सदर कारवाई 15 जुन रोजी करण्यात आली असुन 3 आरोपींवर विविध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मूल-सावली तालुक्यातुन मोठया प्रमाणवर जनावरांची अवैध वाहतुक होत असल्याचे वृत्त दे धक्का एक्सप्रेसने प्रकाशीत केले होते, त्यानंतर केवळ 4 दिवसात सावली पोलीसांनी खेडी फाटयावर नाकाबंदी करून 34 जनावरांची सुटका केली, दरम्यान 15 जुन रोजी सावली पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिका अर्जुन इंगळे, सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली मूल-सावली मार्गावर केलेल्या नाकाबंदी मध्ये एम एच 30 ए बी 104 या आयशर ट्रक मध्ये 16 गोवंश आणि 4 म्हैस वर्गीय जनावरे अवैधरित्या वाहतुक करीत असताना आढळुन आले. सदर वाहन आणि जनावरे असा एकुण 12 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सावली पोलीसांनी तिन आरोपींवर महाराष्ट्र पशु. संरक्षण अधिनियम, प्राणी छळ प्रति. अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, मोटर वाहन कायदाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिका अर्जुन इंगळे, सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दर्शन लाटकर, विशाल दुर्याेधन, धीरज पिदुरकर, चालक कुळमेथे यांनी केली.