ट्रक चालक फरार
बल्लारपूर (प्रतिनिधी) : बल्लारपूर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावुन दुचाकीने घरी जात असलेल्या महिला पोलीस कर्मचाÚयांच्या दुचाकीला राजुरा येथे मुख्य महामार्गावर मागुन येणारÚया चारचाकी वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी 6.40 वाजता दरम्यान घडली. मोनल मेश्राम असे अपघातात ठार झालेल्या महिला पोलीसांचे नांव आहे.
बल्लारपूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस मोनल मेश्राम यांनी दुचाकी कं्र. एम एच 34 ए टी 1877 या मायस्ट्रो दुचाकीने बल्लारपूर येथुन राजुरा येथे आपल्या घरी परत येत असताना मागाहून येणाऱ्या एम एच 28 बि ई 4158 क्रमांकाच्या ट्रक ने धडक दिली. धडक बसताच त्या आपल्या मायस्ट्रो दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्या खाली कोसळल्या व डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात महावितरण विभागात कार्यरत पती विलास बनकर व दोन लहान मुले आहेत