अन्यथा आंदोलनात्मक मार्ग स्विकारू
मूल (प्रतिनिधी): पावसाचे पाणी पाण्याच्या उद्देषने काही दिवसांपासुन क्रिडा संकुल मध्ये नालीचे काम सुरू आहे, मात्र सदर नाली काही महिण्यापुर्वी बांधण्यात आलेली असतानाही ती नाली तोडुन त्या नालीला सदर नाली जोडण्यासाठी नगर पालीकेच्या कर्मचाÚयांकडुन हालचाली सुरू आहे, सदर प्रकार हा निधी अपव्याय करण्याचा प्रकार आहे यामुळे सदर नाली नहराची जमिन असलेल्या सर्व्हे नं. 96 मधुन काढण्यात यावे अन्यथा वार्डातील नागरीकांकडुन जनआंदोलन करण्यात येईल असा इषारा नागरीकानी प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातुन केले आहे.
मूल शहराच्या विकासासाठी शहराच्या मध्यभागी तालुका क्रिडा संकुलाची निर्मीती करण्यात आली आहे, तालुक्यात खेळाडु तयार व्हावे यासाठी वेगवेगळे खेळ याठिकाणी खेळल्या जातात, सुमारे 2 ते 3 हेक्टर मध्ये पसरलेल्या क्रिडा संकुल मध्ये पावसाचे पाणी जमा होवुन राहु नये यासाठी प्रषासनाने नालीचे काम सुरू केलेले आहे, सदर नालीचे पाणी बाहेर काढण्यासाठी काही महिण्यापुर्वीच बांधण्यात आलेल्या सुव्यवस्थीत स्थितीत असलेल्या नालीला जोण्याचा प्रकार सुरू आहे, त्यासाठी नालीच्या जवळ असलेल्या स्ट्रिट लॉईट सुध्दा लावण्यात आलेले आहे. सदर खाब आणि सुव्यवस्थीत असलेली नाली तोडुन त्याठिकाणी सुमारे 5 फुट रूंद नालीचे बांधकाम करण्यासाठी नगर पालीकेचे कर्मचारी पुढाकार घेत आहे, काही महिण्यांपुर्वीच लाखो रूपये खर्च करून सदर नाली आणि स्ट्रिट लॉईट खांबचे बांधकाम करण्यात आलेले आहे, यामुळे नालीचे बांधकाम तोडुन निधीची उधळपट्टी करण्यापेक्षा जवळच असलेल्या सर्व्हे नं. 96 मधील जुन्या नालीला जोडल्यास निधीची होणारा अपव्याय थांबु षकतो, यामुळे क्रिडा संकुलमधील नालीची जोडणी सर्व्हे नं. 96 मधुन काढण्यात यावे अषी मागणी नागरीकांनी केली आहे. अन्यथा जनआंदोलन करू असा इषाराही वार्डातील नागरीकांनी प्रशासनकडे दिलेल्या निवेदनातुन केली आहे.