वनविभागाच्या कक्ष क्रं. 756 जवळील घटना
मूल (प्रतिनिधी) : शेतात गेलेल्या मजुरावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना करवण बिटातील कक्ष क्रं. 756 जवळ घडली. रामभाऊ करू मरापे वय 43 वर्षे असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मजुराचे नांव आहे.
मूल तालुक्यातील बफर क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मौजा करवण बिटातील कक्ष क्रं. 756 ला लागुन मोठया प्रमाणावर शेती आणि जंगलव्याप्त परिसर आहे, शेतात जाण्यासाठी मंगळवारी सकाळी निघालेल्या रामभाऊ कारू मरापे याच्यावर वाघाने हल्ला केल्याने ते जागीच ठार झाले. त्यांचे मृतदेह कक्ष क्रं. 756 जवळील नाल्याजवळ असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यानी दे धक्का एक्सप्रेस शी बोलताना सांगीतले.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचुन पंचनामा करीत आहे.
तालुक्यात प्रादेशिक आणि बफर क्षेत्राचे मोठे परिसर असुन याठिकाणी वन्यप्राण्याचा मोठा वावर आहे, बफर क्षेत्रातील मारोडा परिसरात मागील काही दिवसात 2 इसमाना वाघाने ठार केल्याची घटना ताजी असताना आज परत मजुरावर वाघाने हल्ला करून ठार केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.