चाळीस वर्षांपूर्वीच्या अतिक्रमणावर वनविभागाचा बुलडोजर

अतुल कोल्हे भद्रावती :
ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात शेतकऱ्यांनी वन जमिनीवर अतिक्रमण केले होते चाळीस वर्षापासून असलेले अतिक्रमण काढण्यासाठी वन विभागाने वारंवार सूचना केल्या मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर या अतिक्रमणावर वन विभागाने बुलडोजर चालविला.

ताडोबा – अंधारी व्याघ्र चंद्रपूर बफर परिक्षेत्रात घंटा चौकी, चेक निंबाळा संरक्षित वन ६१८ व ६१९ या कक्षात तब्बल ४५ सेक्टर वन जमीन शेतकऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली होती. या जमिनीसाठी शेतकऱ्यांनी टाकलेले वैयक्तिक दावे नामंजूर झाले त्यामुळे चाळीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेली वनजमीन अतिक्रमण काढण्यासंदर्भात वारंवार सूचना करण्यात आल्या. शेतकऱ्यांचे मन परिवर्तन करण्याचे काम वन विभागाने केले अखेर २७ मे पासून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली ही कारवाई क्षेत्र संचालक ताडोबा श्रीरामगावकर, उपसंचालक बफर गुरु प्रसाद यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी एस व्ही महेशकर, निमकर, गीता चव्हाण, तसेच वन कर्मचारी यांनी केली.