अखेर गौरव शामकुळेनी सोडली राष्ट्रवादी

जिल्हाध्यक्ष भटारकर यांच्याकडे सोपविला राजीनामा

मूल (प्रतिनिधी) : मूल येथील सामाजीक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले गौरव गोपीचंद शामकुळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. सहा महिण्यापूर्वी जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर यांचे नेतृत्वात गौरव शामकुळेनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादीत प्रचंड प्रमाणात गटबाजी असून, या गटबाजीमुळे पक्षाचे माध्यमातून कोणतेही काम करणे अडचणीचे जात असल्यांचे गौरव शामकुळे यांचे मत आहे.

नितीन भटारकर हे पक्षाचे बाहेरच्या इतर पक्षातील लोंकासोबत अंतर्गत सलोख्याचे सबंध ठेवतात, मात्र कार्यकर्त्यांनी इतर पक्षाचे लोकांसोबत चर्चा केली तर, त्यांना पक्षविरोधी ठरविण्यांची दुटप्पी भुमिका घेत असल्यांचाही आरोप शामकुळे यांनी केला आहे.

मागील काही दिवसापासून, आपण सोमनाथ व मूल येथे स्वच्छतेचे कार्य हाती घेतले आहे, मात्र हे कार्य राजकीय कार्य नसल्यांचा माझेवर आरोप करून, हे काम करण्यांऐवजी पार्टीचे काम करा असा सल्ला मला देण्यात आल्यांने, राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघड झाला. यामुळे या पक्षात काम न करण्यांचा निर्णय घेतल्यांचे गौरव शामकुळे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.