मूल (प्रतिनिधी) : जिल्हयाचे माजी पालकमंत्री तथा क्षेत् यांच्या प्रयत्नातून मूल शहराचा कायापालट होत आहे परंतु स्थानिक लोकप्रतिधिनीचे विविध विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मूल शहराला विविध समस्येने ग्रासले आहे. याकडे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष देवून मूल शहरातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकाÚयांना समज देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
17 सदस्य असलेल्या मूल नगर पालीकेत भाजपाची सत्ता आहे, 17 पैकी 15 नगरसेवक भाजपाचेच आहे, केंद्रात भाजपाची सत्ता आहे, याआधी युती शासनाची सत्ता होती, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे युती शासनाच्या तिजोरी चाबी असल्याने त्यानी आपल्या गृहक्षेत्रातील मूल शहराचा विकास झपाटयाने केला, सध्या महाविकास आघाडी सरकार असतानाही आपल्या बुध्दीचातुर्याने मूल तालुक्याचा विकास केला. मूल शहरातील मुख्यमार्गावरून प्रवेश करताच एखादया मोठया शहरात प्रवेश केल्याचा भाष नागरीकांना होतो, त्यापध्दतीनेचे स्थानिक लोप्रतिनिधी लक्ष देवून शहरातील समस्या सोडविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करायला पाहिजे परंतु तसे होताना दिसून येत नाही, यामुळेच अनेक वार्डात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेे, अंतर्गत रस्ते, नालीची समस्या कायम असून कंत्राटदाराच्या हुकूमशाहीमुळे अनेक रस्ते व नाल्याचे काम अपुर्ण आहे, शहरात मुसळधार पाऊस येताच नागरीकांच्या घरात पाणी जात आहे, यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यासोबतच शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, डुक्करांचा हौदोस वाढलेला असून याकडेही नगर पालीका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहराला विदर्भातील सुदर व स्वच्छ शहर निर्माण करण्याचा विळा उचललेला आहे, यामुळेच मूल शहरात करोडो रूपयातुन विकासकामे करण्यात आले आहे, शहरातील मुख्यमार्गाचा चेहरामोहरा बदलेला आहे, परंतु वार्डा-वार्डात अनेक समस्या अजुनही कायम आहेत, त्यासोडविणे महत्वाचे आहे, यासाठी स्थानिक लोकप्रतिधिनी लक्ष देवून अधिकाÚयांकडून काम करून घेण्याची आवश्यकता आहे. यासह मूल शहरात आरोग्य, विज समस्या आवासुन उभी आहेत. तांदळाची मोठी बाजारपेठ असलेल्या मूल शहरात दुरसंचार निगमची सेवा कुचकामी ठरली आहे, वाहतुक व्यवस्थेचे तिनतेरा वाजले असून याकडे पोलीस प्रशासनाले लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा करोडो रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातून ओव्हरलोड वाहतुक केली जात आहे असे एक नाही तर अनेक समस्या अजुनही कायम आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.