नवनियुक्त पदाधिकाÚयांचे अनेकांनी केले अभिनंदन
मूल (प्रतिनिधी): दरवर्षी करोडा रूपयांची आर्थीक उलाढाल करणाÚया येथील भाग्यश्री महिला नागरी सहकारी पत संस्थेच्या अध्यक्षपदी अनिता मोगरे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन येथील सहा. निबंधक कार्यालयातील आर. डी. कुमरे हे काम बघितले.
येथील भाग्यश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. नवनिर्वाचित संचालकामध्ये स्मिता कामडे, ज्योती भांडेकर स्मिता गुरुनुले, सोनल कोकाटे, रजनी येनुरकर, वनमाला रामटेके, मीराताई कामडे, सिंधुताई पुप्पलवार यांचा समावेश आहे. संस्थेचे संस्थापक सल्लागार अनिल मोगरे यांच्या मार्गदर्शनात सर्व संचालकांची अविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालकामधून अध्यक्षपदी अनिता मोगरे, उपाध्यक्षपदी जयश्री चन्नूरवार तर मानद सचिव पदावर अलकाताई कामडी यांची अविरोध निवड करण्यात आली.
भाग्यश्री महिला नागरी सहकारी पत संस्थेची स्थापना सन 2002 मध्ये झालेली असून सुरूवाती पासून ऑडिट वर्ग असलेली ही तालुक्यातील महिलांची एकमेव संस्था आहे सध्या या संस्थेची वार्षिक उलाढाल 28 कोटी रुपये आहे असल्याचे बॅंकेच्या व्यवस्थापक मंडळानी सांगीतले.
नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाने संस्थेच्या प्रगतीसाठी विविध योजना राबविण्याचा मानस व्यक्त केला. संस्थेचे मार्गदर्शक अनिल मोगरे, नवनिर्वाचित अध्यक्षा अनिता मोगरे, उपाध्यक्षा जयश्री चन्नूरवार व संचालक मंडळाचे संस्थेच्या माजी संचालक डॉ. प्रविणा वÚहाडे, कल्पनाताई शेंडे, माजी नगराध्यक्ष रत्नमालाताई भोयर, नंदा डांगरे, अंजली धाबेकर, माधुरी दांडेकर, शिल्पा बांबोडे, मेघा कवलकर, रजनी साखरवाडे, किरण बंडावार, पुण्यश्री रेवतकर, वर्षा मानापुरे, सपना भूरे, मंगला सावरबांधे, जयश्री मंगरुळकर, सुनीता करंबे, व्यवस्थापक भास्कर पोईनकर यांनी अभिनंदन केले.