कॉंग्रेस-भाजपाच्या पुढाकारातून अविरोध निवड
मूल (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रासाठी अतिशय महत्वाची मानली जाणाऱ्या सेवा सहकारी संस्थेच्या मारोडा, चिरोली आणि बेंबाळ येथील निवडणुक कार्यकम जाहिर केला होता, त्यानुसार 10 मे रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असतानाच सदर गावच्या संस्थेच्या उमेदवारांनी पुढाकार घेत अर्ज मागे घेतल्याने तालुक्यातील तिन्ही सहकारी संस्थेची निवडणुक अविरोध झाली आहे.
मूल तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुक कार्यक्रम जाहिर केला होता, तालुक्यातील जवळपास सर्वच सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुक पार पडल्या, यापैकी बहुतांष सहकारी संस्थेच्या निवडणुका अविरोध झाल्या असुन राजोली आणि डोंगरगांव सेवा सहकारी संस्थेची निवडणुक मतदान घेऊन पार पडली. तर काही दिवसांवर नांदगांव येथील सेवा सहकारी संस्थेची निवडुक होणार आहे, मूल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने निवडणुकीत सहभाग घेतला नाही यामुळे यासंस्थेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे, परंतु तालुक्यातील सर्वच सहकारी संस्थेवर भाजपाने कमी जास्त प्रमाणात उमेदवार उभे केले, मात्र अविरोध निवडणुक घेण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे बऱ्याच ठिकाणी निवडणूक अविरोध झाल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील राजोली, आणि डोंगरगांव येथे भाजपा-कॉंग्रेसची छुपी युती झाली होती मात्र कॉंग्रेसच्या निष्ठावंताना यामध्ये डावलल्याने काही कॉग्रेसचे पदाधिकारी सदर निवडणुकीत उडी घेत निवडणुकीचा सामना केला होत हे विशेष. नांदगांव येथेही कॉग्रेस-भाजपाची छुपी युती असल्याची चर्चा आहे. यामुळे याठिकाणी निवडणुकीचा सामना चांगलाच रंगतदार ठरणार बोलल्या जात आहे.
मूल तालुक्यातील मारोडा सेवा सहकारी संस्थेवर लोकनाथ नर्मलवार, विनोद रोटावार, रितेश जिडगलवार, पंकज पुल्लावार, दिलीप नेरलवार, सुरेश कालबोगवार, नेताजी वाढई, ताराचंद गेडाम, सुनिल दुपारे, देविदास गिरडकर, गणेश नेतुलवार, सुनिता मुद्दमवार, अल्का कोहपरे हे अविरोध निवडुण आले.
चिरोली सेवा सहकारी संस्थेवर दिलीप बुक्कावार, नरेंद्र बुरांडे, प्रसेन कंदलवार, दिवाकर कामीडवार, गौतम वाळके, तुळशिदास कुंभारे, सुभाष बुक्कावार, सुनिल आयलनवार, बापुजी मडावी, रमेश पाद्मवार, प्रभाकर गंधेवार, रेखा बुरांडे, गुणाबाई वाढई हे अविरोध निवडुण आले. तर बेंबाळ येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर रामदास मडावी, पुंडलिक मेश्राम, विकास सिडाम, राजेश्वर गेडाम, धनराज गेडाम, शामराव आत्राम, उषा शेरकी, नंदु आकनुरवार, मदनकुमार उराडे, चंदु मारगोनवार, विस्तारी चिलरवार, शारदाबाई मडावी, निर्मला गेडाम अविरोध निवडुण आले.