सवौच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याबाबत सवौच्च न्यायालयानेे आदेश दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करावे असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. विरोधी पक्षाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ देणार नाही असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यास विरोध केला होता. तर राज्य सरकारनेही ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यत निवडणूका घेणार नाही अशी भूमिका घेतली होती.
राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद यासह एकूण 18 महानगरपालिकांची मुदत संपली आहे. या ठिकाणी राज्य सरकारने परीक्षक नेमले आहेत. या स्थानिक स्वराज संथांच्या निवडणूक घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिक दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने येत्या दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करावी असे निर्देश दिले आहेत.