राकेश रत्नावार यांचा वाढदिवस विविध उपकमाने साजरा

मूल (प्रतिनिधी) : येथील संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष, मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांचा वाढदिवस तहाणलेल्या व्यक्तींसाठी पाणपाई, खेडाळुना एनर्जी ज्युस आणि बिस्कीट व रूग्णांसाठी फळ वाटप करून साजरा करण्यात आला.

दिवसेंदिवस उन्हाचा दाहकता वाढत आहे मात्र प्रशासन बस स्थानक परिसरात पाण्याची व्यवस्था केलेली नाही, यामुळे जिल्हा कॉंग्रेसच महासचिव राकेश रत्नावार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन बस स्थानक परिसरात पाणपाई सुरू करून गरजु व्यक्तींसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली. सदर पाणपाईचे उद्घाटन चिचवटा येथील कमलाबाई वाढई या 65 वर्षांच्या वृध्द महिलेच्या हस्ते करण्यात आले.

मूल येथील कर्मविर महाविद्यालयाच्या पटांगणावर पोलीस भरती, सैनिक भरतीसाठी सराव करणाÚया खेडाळुना एनर्जी ज्युस, बिस्कीटचे वापट वाटप करून भरतीसाठी शुभेच्या देण्यात आले, मूल उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना फळ वाटप करण्यात आले,

यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष राकेश रत्नावार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल शेरकी, शहर उपाध्यक्ष संदिप मोहबे, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक तथा साई मित्र परिवाराचे अध्यक्ष विवेक मुत्यलवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश फुलझेले, रंजीत आकुलवार, अभिजीत चेपुरवार, संजय भुसारी, सचिन मुळेवार व कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.