चंद्रपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील नाकोडा येथे झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात नकोडा येथील रहिवासी आसम परिवारतील तिन व्यक्ती गंभीर जखली झाले, आसम परिवाराची आर्थीक स्थिती हलाखीची असल्याने त्याना आर्थीक सहाय्य देवनिल इण्डेन गॅस कडुन 50 हजारांचे आर्थीक मदत करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रिजभुषण पाझारे यांनी आसम कुटुंबियाना आर्थीक मदत करण्याची मागणी देवनिल इण्डेनचे व्यवस्थापक भांडेकर यांना भेटुन केली होती, 3 मे रोजी देवनिल इण्डेन ग्रॅसचे संचालक माजी आमदार देवराव भांडेकर व व्यवस्थापक डॉ. महेश भांडेकर यांनी गॅस स्फोटात जखमी झालेल्या आसम परिवाराला पन्नास हजार रूपयाचे आर्थीक सहाय्य व योग्य उपचारासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, सरपंच किरण बांदुरकर, माजी सरपंच ऋषी कोवे, उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्राम पंचायत सदस्य रजत तुरानकर, राजय्या कंप्पा , प्रभाकर लिंगमपेल्ली, व आसम परिवार तसेच नागरिक उपस्थित होते.