सोमनाथच्या डोंगरदेवी जवळील घटना
मूल (प्रतिनिधी) : नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमनाथ जवळील जंगलात शनिवारी घडली. गजानन आनंदराव गुरूनुले वय 65 वर्षे रा. मारोडा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्याचे नांव आहे.
मूल तालुक्यात वन्यप्राण्याचा मोठा संचार आहे, पाण्याच्या शोधात वणवण गावाच्या जवळ वन्यप्राणी यायला लागले आहे, काही दिवसांपुर्वी रोजगार हमी येाजनेच्या कामावर गेलेल्या मजुराला डब्बा नेवुन देत असताना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती, नेहमी प्रमाणे गजानन आनंदराव गुरूनुले हे बैल घेऊन चराईसाठी नेले असता शनिवारी दुपारच्या सुमारास वाघाने हल्ला करून ठार केले व सोमनाथच्या जंगलात ओढत घेऊन नेले, दरम्यान गजानन गुरूनुले हे घरी न आल्याने त्याचा शोधशोध केले असता शुनिवारी रात्रौ 10 वाजता दरम्यान त्यांचा मृत्तदेह जंगलात आढळुन आला.
मारोडा ग्राम पंचायतचे माजी सदस्य जितेंद्र गुरूनले याचे ते वडील असुन त्यांच्या पध्चात पत्नी आणि मुले आहेत
घटनास्थळाला वनविभागाचे पथक आणि पोलीस पथक दाखल झाले असुन पंचनामा सुरू आहे
वाघाचा बंदोतस्त करा: गावकÚयांची मागणी
काही दिवसांपुर्वी वाघाने एका इसमाला ठार केल्याची घटना ताजी असतान शनिवारी गजानन गुरूनुले यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले, दिवसेदिवस वाघाच्या हल्लाची घटना मोठया प्रमाणावर घडत आहे, यमाुळे वाघाचा बंदोवस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.