जानाळा चिरोली मार्गावर अपघात

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

मूल (प्रतिनिधी) : जानाळा येथुन दुचाकीने कांतापेठ येथे जात असलेल्या एका युवकाचा चारचाकी वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यु झाल्याची घटना जानाळा चिरोली मार्गावर सोमवारी रात्रौ 8 वाजता दरम्यान घडली. महेश पैकुजी मरापे वय 24 वर्षे रा. जानाळा असे मृत्तक युवकाचे नांव आहे.

जानाळा येथील महेश पैकुजी मरापे वय 24 वर्षे हा जेवन करून आपल्या दुचाकीने कांतापेठ कडे जात होता, दरम्यान आयसर या चारचाकी वाहने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने त्याचा जागीच चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मूल पोलीसांना देण्यात आली. महेश मरापे याला आई वडील असुन तिन बहीण आणि 1 भाऊ आहे.

मूल पोलीस घटनास्थळी येवुन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.