नांदगाव पोडे येथे शेतकरी सहकार पॅनल विजयी

विसापूर (प्रतिनिधी) : नांदगाव पोडे सेवा सहकारी संस्थेच्या १२ संचालकाची निवडणूक अटीतटीची होण्याचा अंदाज दिसत असताना शेतकरी सहकार पॅनलने १२ पैकी १२ जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत निवडणूक जिंकून सगळ्याचे अंदाज स्पेशल खोटे ठरवित शेतकरी परिवर्तन पॅनलचे आव्हानच संपुष्टात आणले.

अत्यंत संवेदनशील समजली जाणारी सेवा सहकारी संस्था मर्या.नांदगाव पोडे निवडणूक ही पं.स सदस्य व सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष गोविंदा पोडे यांनी एकहाती जिंकून विरोधकांचे चांगलेच कंबरडे मोडले. या निडणुकी मध्ये सर्व साधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी गटातून विजयाचे शिल्पकार गोविंदा पोडे, विलास पोडे,, सुनील शेंडे, संदीप धांडे, गजानन निखाडे, पुरुषोत्तम उरकुडे, देवराव परसुटकर, सूर्यकांत आमने, अनुसूचित जाती/जमाती गटातून संजय सोयाम, वि.जा./भ.जा विंमाप्र गटातून वैशाली पोचमपल्लीवार, महीला राखीव गटातून कांता लोनगाडगे ,मंगला मुक्के हे उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवारांचे बल्लारपूर भाजपा तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार यांनी अभिनंदन केले. विजयाची माळ खेचून आणण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या विश्वनाथ मुक्के, अनिल उरकुडे, नानाजी वैद्य, जीवन निमकर, संजय टेकाम, ऋषीदेव आमने, दिवाकर पंदीलवार, दिलीप खापणे, नामदेव वराटे,शालिक दरेकर,संदीप आक्कुलवार, सुमन उपरे, मधुकर उरकुडे, संदीप निमकर, लक्ष्मण पोडे ,अनिल डांगेवार व संतोष पोडे यांचे गोविंदा पोडे, यांनी आभार मानून विजयाचे श्रेय त्यांना दिले व समोर सेवा सहकारी संस्थेत कोणताही भेद न करता सगळ्या सदस्य बांधवांचे काम अग्रक्रमाने करण्यात येईल असे आश्वासन दिले.