सहकार क्षेत्रातील निवडणुकीकडे भाजपाच्या दुर्लक्षाला विधानसभेची किनार तर नाही ना !

जनतेच्या मनात संशयकल्लोळ

मूल (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रासाठी अतिशय महत्वाची मानली जाणारी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीपासुन भाजपा अलीप्त राहात असल्याने याला भविष्यातील विधानसभेची किनार तर नाही ना असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.

मूल तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांची निवडणुक लागलेली आहे, काही संस्थेची निवडणुक पार पडली तर काही संस्थेच्या निवडणुक कार्यक्रम जाहिर होणार आहे, राजोली येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणुक काही दिवसांपुर्वी पार पडली, याठिकाणी कॉग्रेस विरोधी कॉग्रेस अशी लढत झाली, मात्र याठिकाणी भाजपाचे काही उमेदवार कॉंग्रेससोबत ‘‘सेटींग’’ करून अविरोध निवडणुक पार पाडण्याचा प्रयत्नात असताना सहकार क्षेत्राशी जवळीक असलेल्या काही कॉग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुक घेण्यास भाग पाडले, मात्र हेच काम भाजपा का करू शकली नाही असा प्रश्न शेतकऱ्यासह भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना पडला आहे.

तालुक्यात डझनभर सोसायटया आहेत, तालुका निबंधक यासोसायटयाच्या निवडणुकीसंबधाने कार्यक्रम जाहिर करीत असते, परंतु यानिवडणुकीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नाही, वरिष्ठ नेतेही याकडे दुर्लक्ष करीत आहे, की अंतर्गत ‘‘सेटिंग’’ आहे हे अजुन तरी कळायला मार्ग नाही, काही दिवसांवर मूल नगर पालीका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि काही ग्राम पंचायतच्या निवडणुका लागणार आहे, यामुळे भाजपा सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत आहे काय? कि भविष्यात होणाऱ्या विधानसभेची किनार भापपाला सहकार क्षेत्रापासुन दुर करीत आहे असे एक ना अनेक प्रश्न यानिमीत्त्ताने उपस्थित होत आहे.

सहकार क्षेत्रातील बहुतांष संस्थेत कॉग्रेसची सत्ता आहे, यावषीही भाजपाच्या दुर्लक्षामुळे कॉंग्रेसच्या ताब्यात अनेक संस्था राहतील यात दुमत नाही, परंतु जिल्हयातील भाजपा नेत्यानी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण भागतील भाजपा कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहे.