साठ लाखाचा खातेदाराला चुना
खातेदाराची भद्रावती पोलिसात तक्रार
10 फेब्रुवारीला झालेल्या प्रकरणानंतर हे समोर आले प्रकरण
अतुल कोल्हे भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक केतुन शेतमजूर, शेतकरी असे तब्बल 26 बँक खातेदाराच्या खात्यातून परस्पर 60 लाख गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने या प्रकाराबाबत भद्रावती पोलीस सह बँकेच्या वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करून संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी या ग्राहकांनी पत्रपरिषदेत केली आहे.
दिनांक 10 मार्चला विदर्भ कोकण ग्रामीण बँक चंदनखेडा येथील रामचंद्र मारुती केदार या शेतमजुराच्या खात्यातून 50000 अस्थाई कर्मचारी नंदकिशोर हनवते यांनी बनावट स्वाक्षरी करून दुसऱ्या खातात वढते केल्याचा प्रकार घडला होता याबाबत भद्रावती पोलिसात तक्रार दाखल झाली होती. या घटनेबाबत चौकशी चालू असतांना येथील ग्राहकांनी बँकेशी संपर्क साधून आपल्या खात्यामध्ये रक्कम सुरक्षित आहे की नाही याबाबत चौकशी केली असता आतापर्यंत तब्बल 26 खातेदाराच्या खात्यातून 60 लाख गहाळ झाल्याचा समजताच या ग्राहकांना चांगलाच धक्का पोहोचला आहे यात धरमदास चौधरी यांच 38 0 130, दादाजी कोकडे 152 65 0 0 बाबुराव भुसारी 117 18 30 पुरुषोत्तम लाखे 167 500, आनंदराव दडमल 265000 चंद्रकला दडमल 21000, लोकेश निमजे 70 70 0, नंदकिशोर निमजे 1397 30 तोताराम निमजे 39000, दीपक निमजे 167000 गीता निमजे 15 3000 मनीषा सावसकले 56000 सुमन हनवते 220 300 शरद कोकडे 15 1080 रेखा कोकडे 25 9700 रेमुबाई कोकडे 80000 वेणूबाई भैसारे 190000 वसंता लाखे 65000 प्रमोद कोकळे 415000 सुनील कोकडे 30000 रामचंद्र कोकळे 5000 0 अशाप्रकारे 58 45000 खात्यातून गहाळ झाल्याचा प्रकार घडला असून अजून कित्येक ग्राहकाची सक्कम गहाळ झाल्याचे माहिती समोर यायची आहे रकमेची अफरातफर करणाऱ्या दोषीवर कारवाही करण्याची मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली यावेळी सुधीर मुडेवार धरमदास चौधरी, दादाजी कोकडे ,बापुराव भुसारी, दिपक निमजे ,गिता निमजे, मनीषा हनवते ,वसंता लाखे आदी उपस्थीत होते
प्रफुल आत्राम मॅनेजर विदर्भ कोकण ग्रामिण बॅक चंदनखेडा: याबाबद विचारना केली असता विभागीय व्यवस्थापक खाडे यांचे कडे पाठवले आहे त्यांनी चौकशी समीती नेमून खत्री नामक अधीकारी नेमल आहे . या नंतर प्रकरण बाहेर येईल त्या नंतर पोलीसात तक्रार दाखल करण्यात येइल.