कोंढा येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अतुल कोल्हे भद्रावती : भद्रावतीच्या शिंदे परीवारांसोबत माझे तीन पिढयांपासूनचे स्नेहपूर्ण संबंध आहे. याच परीवारातील रविंद्र शिंदे यांनी सुरु केलेले सामाजिक क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन वरोरा येथील महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले .
श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियांतर्गत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे ) आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कोंढा येथे जि.प. प्राथमिक शाळेत आज दि. २९ मार्च रोज मंगळवार ला भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे उदघाटक म्हणून डॉ. विकास आमटे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. कोंढा येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. या शिबिराचा लाभ कोंढा परीसरातील गावा- गावातील जनतेनी घेतला.
या प्रसंगी व्यासपिठावर अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम मत्ते यांच्यासह चंद्रपूर जिल्हा धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समितीचे जिल्हाध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते ,भद्रावतीचे सुप्रसिध्द नाक, कान व घसा सर्जन डॉ. विवेक शिंदे, ह्या शिबिराचे आयोजक रविंद्र शिंदे,सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विद्यान संस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर ताजने, प्रविण सूर ,दत्ता बोरेकर, घोडपेठचे उपसरपंच प्रदिप देवगडे,सरपंच महेश मोरे, राम समन्वार, बाळा पा. मत्ते, लता खरवडे, अविनाश गोंडे , बंडू वादेकर आदि उपस्थित होते.
सर्वप्रथम भास्कर ताजने यांनी प्रास्ताविकपर विचार व्यक्त करतांना शिबिर आयोजना मागील भुमिका स्पष्ट केली. याप्रसंगी शिबिराचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सामाजपयोगी कार्याची माहिती दिली. थोर समाजसेवक श्रध्देय बाबा आमटे यांच्या कार्याची माहिती नवीन पिढाला व्हावी. सर्वसामान्य जनतेला प्रभावी आरोग्य सुविधा मिळावी.आर्थीक अडचणीमुळे कुणीही आरोग्य विषयक उपचारापासून दुर राहणार नाही. या दृष्टीने या पुढे सुध्दा विविध ठिकाणी अश्या प्रकारचे शिबिर आयोजित करु. तसेच सामाजिक कार्य निरंतर सुरू ठेऊ, याचा लाभ जनतेनी घ्यावा. असे आवाहन रविंद्र शिंदे यांनी केले. याप्रसंगी डॉ. विकास आमटे यांच्या शुभहस्ते सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विद्यान संस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांचा सत्कार करण्यात आला. अँड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. विवेक शिंदे ,दत्ता बोरेकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन अभय राघमवार यांनी केले. याप्रसंगी फार मोठया संख्येत बंधू -भगिनी उपस्थित होते.