कोंढा येथे श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियांतर्गत २९ मार्च रोजी भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर

आचार्य विनोबा भावे ग्रामीण  रुग्णालय सावंगी (मेघे) आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांचा संयुक्त उपक्रम

अतुल कोल्हे भद्रावती : श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियांतर्गत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांचा संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कोंढा येथे जि.प. प्राथमिक  शाळेत २९ मार्च रोज मंगळवार ला भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २९ मार्च रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत रुग्णांची नोंदणी करण्यात येईल. या शिबिराचे उदघाटन वरोरा येथील महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. याप्रसंगी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम मत्ते यांच्यासह चंद्रपूर जिल्हा धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समितीचे जिल्हाध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते  आणि भद्रावतीचे सुप्रसिध्द नाक, कान व घसा सर्जन डॉ. विवेक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

कोंढा येथे आयोजित आरोग्य शिबिराचा लाभ जनतेनी घ्यावा. असे संयुक्त आवाहन स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रविंद्र शिंदे, सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विद्यान संस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे तसेच द.मे.आ. संस्था सावंगीच्या सार्वजनिक स्वास्थ विभागाचे संचालक डॉ. अभय मुडे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते मुर्लीधर उमाटे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर ताजने, प्रदिप देवगडे, अविनाश गोंडे, बंडू वादेकर, गणेश जिवतोडे, अजित फाळके, अनुप  खुटेमाटे, बाळा पा. मत्ते व हर्षल शिंदे यांनी केले आहे.

या शिबिरात मेडिसीन तज्ज्ञ डॉक्टर मंडळींकडून रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपण, वारंवार चक्कर येणे इत्यादी उपचार करण्यात येईल. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मंडळीकडून डोळयांचे सर्व आजार, मोतिया बिंदू व तिरळेपणा यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येईल. सर्जरी तज्ज्ञ डॉकटर मंडळीकडून हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्यांचे आजार, मुतखड्यांचे, पोटाचे आजार, थायरॉईड इत्यादीवर उपचार केल्या जाईल. स्त्रीरोगतज्ज्ञ डाँक्टर मंडळीकडून मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांचे आजार इत्यादीवर उपचार करण्यात येईल. बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मंडळींकडून लहान मुलांच्या आजारावर उपचार करण्यात येईल. अस्थीरोगतज्ज्ञ डॉक्टर मंडळीकडून फ्रँक्चर तसेच हाडांच्या सर्व आजारांवर उपचार करण्यात येईल. त्वचारोग, कान, नाक, घसा संबंधी आजार, श्वसनाचे आजार आणि मानसिक आजार या सर्व आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपचार करतील.

हायड्रोसिल, मोतिया बिंदू व  हर्निया ह्या शास्त्रक्रिया अल्प व वाजवी खर्चात करण्यात येईल. शिबिरस्थळावर नोंदणी करण्यात येईल. तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी मोफत केल्या जाईल. भर्ती रुग्णांच्या एक्स -रे काढणे, लघवी चाचणी, सोनोग्राफी मोफत करण्यात येईल. भर्ती रुग्णांना खाट व जेवण मोफत राहील. अतिविशिष्ट चाचण्या सि.टी. स्कॅन, एम.आर.आय. ह्या चाचण्या आवश्यकतेनुसार डॉक्टरच्या सल्यानुसार पन्नास टक्के सवलतीच्या दरात करण्यात येईल. रुग्णांचा आजार महात्मा फूले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार विनामुल्य करण्यात येईल. भर्ती रुग्णांना हॉस्पीटलमध्ये जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था मोफत राहील. शिबिरात येतांना रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड सोबत आणावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.