प्रमोद मेश्राम चिमूर:-चिमूर पंचायत समीती अतंर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसगांव येथे “शाळा पूर्वतयारी अभियाना” अतंर्गत एक दिवसीय केंद्रस्थरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षणाचे उध्दघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू आत्राम याचे हस्ते करण्यात आले तर अद्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी डी जे मेश्राम,प्रमुख मार्गदर्शक औतकार केंद्र प्रमुख मदनापूर,प्रशिक्षणाचे तज्ञ मार्गदर्शक,विशाल वासाडे,
संभाजी रंदिये,यांनी मार्गदर्शन केले.सदत प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी मुखाद्यपक अरविंद फुलझेले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक औतकर केंद्र प्रमुख यांनी तर संचालकन विजया ठवरे ,आभार प्रदर्शन मंगल धारणे यांनी केले या प्रशिक्षणाला मदनापूर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, शिक्षिका, अगंणवाडी सेविका,आदी शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.