120 किलो गांजा जप्त
चंद्रपूर (प्रतिनिधी) : दुचाकी वाहनाने गांजा तस्करी करीत असल्याची गृप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाइेब खाडे यांना मिळाली, माहितीचे आधारे दोन वेगवेगळे पथक तयार करून चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली जवळील शेर ऐ पंजाब ढाब्याजवळ पाळत ठेवुन असताना होंडा सिटी आणी मारूती स्विप्ट या वाहनाची तपासणी केली असात त्याठिकाणी सुमारे 103 किलो 839 ग्रॅम वजनाचे 31 लाख 15 हजार 170 रूपयांचा गांजा आढळुन आला, यावरून आरोपी श्रीनिवास नरसय्या मचेडी वय 50 वर्षे धंदा शिक्षक व शंकर बलय्या घंटा वय 29 वर्षे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस रिरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मूल मार्गे चंद्रपूर शहरात गांजा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली, सदर माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकणी यांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कामडे, सचिन गदादे यांचे नेतृत्वात दोन वेगवेगळे पथक तयार करून मूल-चंद्रपूर मार्गावरील चिचपल्ली जवळील शेर-ए-पंजाब ढाव्याजवळ पाळत ठेवली होती,
दरम्यान होंडा सिटी व मारूती स्विप्ट हे दोन चारचाकी वाहने सदर ढाब्याजवळ आल्या असता दोन्ही वाहनांला थांबवुन चौकशी केली असाता श्रीनिवास नरसय्या मचेडी वय 50 वर्षे धंदा शिक्षक व शंकर बलय्या घंटा वय 29 वर्षे रा. मस्जीद वाडा, सुभाषनगर मथनी करीतनगर तेलंगना अशी नावे सांगीतले. पथकाने वाहनाची झडती घेतली असता दोन्ही वाहनामध्ये मिळुन 51 पाकिटांमध्ये103 किलो 839 ग्रॅम वजनाचे 31 लाख 15 हजार 170 रूपयांचा गांजा आढळुन आला, व वाहतुकीसाठी वाहपरण्यात आलेल्या वाहनाची किंमत 10 लाख रूपये असे एकुण 41 लाख 15 हजार 170 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपींवर कलम 8 (क), 20 (ब), (2)(क) एन. डर.पी. एस अॅक्ट नुसार रामनगर पोलीस स्टेशन येथ्ज्ञे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदर प्रकरणाची यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरिक्षक संदीप कामडे, संचिन गदादे, स. फौ. राजेंद्र खनके, रमेश लोकला, पो. हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, संजय आतकुलवार, ना. पो. शि. सुभाष गोहोकार, सुरेंद्र महंतो, पो. शि. गणेश भोयर, मिलींद जांभुळे, गणेश मोहुर्ले, सतिशबगमारे, गोपीनाथ्ज्ञ नरोटे, रविंद्र पंधरे, पंा्रजल झिलपे, शेखर आसुटकर यांनी केली.