बाखर्डी प्रतिनिधी:- शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर व आय एस ओ ग्रामपंचायत निमणी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत निमणीच्या परिसरात जनावरांना पायखुरी व तोंडखुरी शिबिर आयोजित करण्यात आले होते
यावेळी सदर शिबिराला पशुधन विकास अधिकारी डॉ एस पी कळमकर फिरते प.वि.अ.डॉ डी आर नागले प्रा डॉ शरद बेलोरकर उपसरपंच उमेश राजूरकर विलास कोंगरे परिचर इस्माईल खान पठाण आनंदराव सोनटक्के राजेश भोयर पशुसखी महेश्वरी साळवे आदी उपस्थित होते
निमणी येथे २३ ते २९ मार्च दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये एक दिवसीय जनावरांच्या पायखुरी व तोंडखुरी व विविध आजाराची तपासणी करण्यात आली व लस लावण्यात आली सदर शिबिरात गावातील गाई म्हशी शेळ्या व बैल आदी जनावरांना विविध आजारांच्या संदर्भात रोगप्रतिबंधक लसीकरण व तपासणी करून पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावकरी जनावरे घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते