प्रमोद मेश्राम चिमूर:- आपले गांव “आदर्श गांव” बनवायचे असेल तर प्रथम स्वतः स्वच्छता पाळण्याबरोबरच गावात स्वच्छता ठेवा. गावात 100 टक्के शौचालये झाली पाहिजेत. पाणी शुद्ध ठेवून त्याचा जमिनीत निचरा करा,असे मार्गदर्शनपर विचार महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्कर पेरे -पाटील यांनी व्यक्त केले. चिमुर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या महादवाडी ग्रामपंचायत व समस्त महादवाडी वासीयांच्या वतीने
ग्रामविकासासाठी गावाचा विकास’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजणभा स्कर राव पेरे पाटील यांचे गाव विकासाचे द्रुष्टीने जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात ते आयोजित आपल्या व्याख्यानाप्रसंगी भास्कर पेरे -पाटील यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
भास्कर राव पेरे पाटील यांनी आपल्या गावाचा विकास साधण्यासाठी गेली पस्तीस वर्षे गावाची धुरा सांभाळली त्यांनी गावामध्ये अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या ते महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या झोतात आले त्यांचे नाव महाराष्ट्र भर गाजु लागले त्यांच्या कामाची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली आणी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच म्हणून सन्मानित करण्यात आले, माझ्याही गावाचा विकास करण्याचा माझा संकल्प असून गावतील काही नागरिकांना मला गावच्या विकासाठी साथ द्या अशी अपेक्षा त्यांनी आपल्या प्रस्तविक मध्ये महादवाडी गावचे सरपंच भोजराज कामडी यांनी दिली, राम राऊत यांनी महादवाडी चे सरपंच भोजराज कामडी यांनी सुध्दा भास्कर राव पेरे पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकुन आपल्याही गावाचा सर्वागीण विकास घडवुया या उद्दात हेतूने प्रेरित होऊन भास्कर राव पेरे पाटील यांचे व्याख्यान ठेवले आहेत असे उद्गार त्यांनी केले
जिल्ह्या परिषद गटनेते डॉ सतीश वारजूरकर यांनी सुद्धा गावतील नागरिकांना स्वच्छता विषयक गावतील केर कचरा बाहेर नालीत न टाकात त्याचा योग्य विल्हेवाट लाहून गांव विकासात हातभार नागरीकनि सहभागी व्हावी अशी आशा वेक्त केली या वेळी मंचकावर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगले, पोलिस निरीक्षक मनोज गभने, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़, चिमुर तालुका कांग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष संजय घुटके, ग्रामगिताचार्य प्रा, राम राऊत, माजी उपसभापति रोशन ढोक, अनिता वारजुरकर, सविता चौधरी, प्रा, संजय पीटाडे, सरपंच भोजराज कामडी, भावना बावनकर, नर्मदा रामटेके, अमोद गौरकार, विस्तार अधिकारी गुंतिवार यांची उपस्थिती होती