पोलिस स्टेशन जिवती येथे भव्य मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

रोगनिदान शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून होणार मोफत आरोग्य तपासणी व उपचार

बळीराम काळे जिवती : अरविंद साळवे (भा.पो.से) पोलिस अधीक्षक, चंद्रपूर व अतुल कुलकर्णी,अप्पर पोलिस अधीक्षक,चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून नक्षलग्रस्त, दुर्गम ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या रोगाचे निदान व्हावे, त्यानां वेळीच उपचार मिळावा तसेच स्त्रिया व बालकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी, सामान्य जनतेला योग्य उपचार मिळाल्यास त्यांचे आरोग्य सुद्दढ राहील व त्यांना योग्य निरोगी जीवमान जगण्यास मदत होईल या उदात्त हेतूने भव्य मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन पोलिस स्टेशन जिवती यांच्या विद्यमाने २४ मार्च,२०२२ ला सकाळी ११:०० ते सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत पोलीस स्टेशन जिवती येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबीर डॉ. स्वप्नील टेंभरे, वैद्यकीय अधिकारी,जिवती, डॉ.प्रवीण येरमे, वैद्यकीय अधिकारी, गडचांदूर, डॉ.शारदा येरमे, सोनोग्राफी तज्ञ, मेडिकल कॉलेज,चंद्रपूर, डॉ. गजेंद्र अहिरकर, वैद्यकीय अधिकारी,जिवती, डॉ.कविता शर्मा, स्त्री रोग तज्ञ, प्रा.आ. केंद्र,पाटण, डॉ. आबिद शेख, वैद्यकीय अधिकारी,पाटण, डॉ. संगीता भंडारी, वैद्यकीय अधिकारी,टेकामांडवा, डॉ. एंजल, माता विहार नर्सिंग होम, शेणगाव, डॉ. जोयसी, माता विहार नर्सिंग होम, शेणगाव इत्यादी तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने घेण्यात येत आहे.

रोगनिदान शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून अरविंद साळवे (भा.पो.से) पोलिस अधीक्षक, चंद्रपूर, अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर, सुशीलकुमार नायक, (म.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर, राधिका फडके, पोलीस उपअधीक्षक, (गृह) चंद्रपूर हे उपस्थित राहणार आहेत सदर शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त जनतेने घ्यावा असे आव्हान सचिन जगताप, (स.पो.नी) पोलीस स्टेशन जिवती यांनी केले आहे.