डोणी फाटयाजवळील घटना
मूल (प्रतिनिधी) : हार्डवेअरची वसुली करून दुचाकीने परत येत असताना 2 अज्ञात लुटारूनी दुचाकीला मागुन धडक देवुन वसुलीची रक्कम असलेली बॅग पळवुन नेल्याची घटना बुधवारी रात्रौ 9 वाजता दरम्यान मूल-चंद्रपूर मार्गावरील डोणी फाटयाजवळ घडली. सदर घटनेची तक्रार मूल पोलीस स्टेशनला दिली असुन पोलीस कसुन चौकशी करीत आहे.
मूल येथील एका मोठया हार्डवेअर कंपनीची वसुली करण्यासाठी मूल येथील अक्षय गोवर्धन आणि हळदी येथील दिनेश चलाख हे दुचाकीने गेले होते. वसुली करून परत येत असताना चंद्रपूर मार्गावरून स्कुटीने येत असलेल्या 2 अज्ञात लुटारूनी वसुली करून येत असलेल्या इसमाच्या दुचाकीला मागुन धडक देवुन खाली पाडले, दरम्यान खाली पडलेल्या एका व्यक्तीला मारून जवळ असलेली बॅग लुटारूनी घेवुन पडुन गेले, सदर घटनेची माहिती, हार्डवेअर संचालकाला दिली, बॅग मध्ये नेमकी किती रक्कम होती ते अजुन तरी कळले नाही परंतु लाखो रूपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे
घटनेची तक्रार मूल पोलीस स्टेशन येथे दिली असुन बुधवारी रात्रौ पोलीसांनी ग्रस्त घातली मात्र लुटारू बातमी लिहीतपर्यंत सापडले नाही. बुधवारी पोलीस विभागाचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळावर येवुन पाहणी केली