वाघ आणि तो, 15 मिनीट बघत राहिले
आरमोरी (प्रतिनिधी) : आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी तालुक्यताील सलमाला येथील मुखरू कुमरे वय 70 वर्षे हे आरमोरी येथे येत असताना वन तलावाजवळच्या रस्त्यावर अचानक वाघ त्यांच्या सायकलपुढे आल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली, यावेळी वाघ आणि तो एकमेकाकडे 15 मिनीट वघत राहिले, काळ आला, पण वेळ आली नाही या उत्तीचा प्रत्यय त्यांना यावेळी आला.
तालुक्यताील सलमाला येथील मुखरू कुमरे वय 70 वर्षे हे मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सालमारा ते कनेरी मार्गावरून सायकलने आरमोरी येथे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी जात होते. अचानक सायकल समोर वाघ आला, यावेळी त्यांची चांगलील भंबेरी उडलाली, त्यांनी प्रंगवधान राखत सायकल थांबवुन जवळच असलेल्या मोहफुलाच्या झाडाजवळ सायकल फेकुन दिली आणि स्वतः झाडाच्या बुंध्याच्या आश्रयाने उभे राहिले. सालमारा ते कनेरी मार्गावर सायकलने जात असताना अचानक समोर वाघ आला. त्यामुळे भंबेरी उडालेल्या त्या वृद्ध व्यक्तीने साक्षात मृत्यूचे दर्शन झाल्याचा अनुभव घेतला. वाघ आणि त्यांच्यामध्ये अवघ्या 15 फुटाचे अंतर होते, ते ऐकमेकांकडे 15 मिनीट बघत राहिले,
परिसरात मोठया प्रमाणावर वन्यप्राणी आहेत, यामुळे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांकडून मनुष्यहानी आणि नरबळी जाण्यापूर्वी वन विभागाने वाघांपासून संरक्षण मिळण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.