विसापुरात विद्यार्थ्यांनी वर्धा नदीवर बांधला बंधारा

एसपी महाविद्यालयातील १०५ विद्यार्थ्यांचा सहभाग

राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा उपक्रम

विसापूर प्रतिनिधी:- गावातील पिण्याच्या पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी वर्धा नदी पात्रात बंधारा बांधण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या श्रम संस्कार अंतर्गत चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयातील १०५ विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला. यामुळे विसापूर गावातील पाणी समस्या काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे कोरोना काळ व युवाशक्ती या विषयावर विशेष शिबीर राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विसापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून श्रम संस्कृती रुजविण्याच्या अनुषंगाने वर्धा नदी पात्रात बंधारा बांधला. यामुळे पाण्याचा प्रवाह अडला. नळ योजनेच्या पाणी पातळीत काहीशी वाढ झाली. श्रम संस्काराचे महत्व व सामूहिक प्रयत्नाचे फलीत यामुळे विद्यार्थ्यांना समजून आले. राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या उपक्रम प्राचार्य डाँ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम अधिकारी डाँ. कुलदीप गोंड, डाँ. उषा खंडाळे, डाँ. वदंना खनके, डाँ. पुरुषोत्तम माहोरे,डाँ. निखिल देशमुख, डाँ. राजकुमार बिरादार, विसापूरच्या सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, गजानन पाटणकर, विद्या देवाळकर, शारदा डाहुले, सरोज केकती, ग्रामपंचायत लिपिक संतोष निपुंगे, राहूल टोंगे यांच्या नेतृत्वात वर्धा नदी पात्रात बंधारा बांधण्यात आला.