महाविद्यालयाने साजरा केला धुम्रपान रहीत दिन

सावली प्रतिनिधी :- स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने तालुक्यातील सादागड, टेकाडी येथे राष्ट्रीय धुम्रपान रहीत दिवस साजरा करण्यांत आला. आयोजीत छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावांतील ज्येष्ठ नागरीक अनिल बोमनवार होते. यावेळी भोई समाजाचे अध्यक्ष आनंदराव गोहणे, ज्येष्ठ नागरीक अरूण पोटवार आदि उपस्थित होते.

प्रारंभी महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रकाश घागरगुंडे यांनी उपस्थित नागरीक आणि युवकांना धुम्रपानाचे दुष्परीणाम व त्यावरील उपचार यासंबंधी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या अंतिम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी धुम्रपानासंबंधीच्या वेगवेगळया पोस्टर द्वारे ग्रामस्थांमध्यें जनजागृती करतांना धुम्रपानामूळे होणारे आजार व त्यावरील उपचार व रोग होवू नये म्हणून घ्यावयाची काळजीबाबत आवाहन केले.

कार्यक्रमाला दोन्ही गावांतील नागरीक मोठया संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डाॅ. चंद्रमौली यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.डाॅ.किरण कापगते यांनी केले.