विसापूर प्रतिनिधी: – क्रांतिकारी वीर बाबुराव शेडमाके यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात समजहितासाठी महान कार्य केले. इंग्रज राजवटीविरुद्ध गुलामी मुक्तीचा लढा लढले. इंग्रज शासन व्यवस्थेला जेरीस आणले.मात्र आप्तस्वकीयानी त्यांच्या लोकोपयोगी कार्याचा घात केला. परिणामी इंग्रजानी त्यांना पकडून महान क्रांतिकारकांचा अंत केला. आजही क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केले.
विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्थानिक मुनी समाज भवन, ग्रामपंचायत जवळ क्रांतिकारी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच वर्षा कुळमेथे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम, माजी उपसरपंच सुनील रोंगे, ग्रामपंचायत सदस्य सुरज टोमटे, दिलदार जयकर, ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते, लिपिक संतोष निपुंगे, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, सुवर्णा कुसराम, सरोज केकती, हर्षला टोंगे, रिना कांबळे, विद्या देवाळकर, शशिकला जिवने यांची उपस्थिती होती.
यावेळी क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रदीप गेडाम यांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन लिपिक संतोष निपुंगे यांनी केले, तर आभार ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते यांनी मानले.