जागतिक महिला दिन निमित्तच्या महिला मेळाव्यात हजारो महिलांची उपस्थिती
भांगडीया परिवार सदैव आपल्या पाठीशी राहणार.. आमदार बंटीभाऊ भांगडीया
प्रमोद मेश्राम चिमूर:- महिलांचा मान सन्मान करणे एक दिवस पुरे होत नसून महिला सुशीक्षित होणे गरजेचे आहे. भगिनींना न्याय देण्याचे काम बंटीभाऊ भांगडीया करीत आहे. ७० वर्षात कोण्या राजकारण करणाऱ्यांनी विचार केला नाही. तेव्हा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅस जोडणी देण्याचे काम करीत देशातील महिलांच्या जनधन खात्यात पैसे देण्याचे कार्य केले.भारत स्वच्छ अभियान, मोफत धान्य, आदी जनहित कारी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमलात आणल्या असून राज्य शासन महिलांवर अत्याचार करणारे राजकीय पुढारी वर कोणतीही कारवाई न करता सुटतात कसे? असा प्रश्न भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी करून पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत गुन्हेगार प्रवुती ना महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालते. कोरोना काळात आशा वर्कर यांना दर दिवशी ३५ रु देण्याचे सरकारने सांगितले परंतु तीन वर्षे झाले तरी आशा वर्कर ना थकलेले मानधन देण्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी विधानसभा अधिवेशनात मागणी रेटून धरण्याची सूचना केली. महाविकास आघाडी सरकारचे पुढारी खालच्या स्तरावर टिप्पणी महिलांवर करतात हा महिलांचा अपमान नाही काय? असा सवाल करीत जरूर करारा जवाब देण्याची ताकीद देत महाराष्ट्र मध्ये महिलांचा अपमान सहन करणार नसल्याची ताकीद चित्रा वाघ यांनी दिली.
जागतिक महिला दिन निमित्ताने भाजप महिला आघाडीच्या महिला मेळाव्यात भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ बोलत होते. यावेळी आमदार बंटीभाऊ भांगडीया, मेघाताई भांगडीया अपर्णा भांगडीया आसावरी देशमुख, भाजप प्रदेश सदस्य डॉ श्याम हटवादे वसंत वारजूकर भाजप ओबीसीमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री जुनेदखान भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार जीप उपाध्यक्ष रेखाताई कारेकर , भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलम राचलवार , डॉ दीपक यावले , भाजप नागभीड तालुका अध्यक्ष संतोष रडके,माजी सभापती प्रकाश वाकडे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, मच्छीमार आघाडी तालुका अध्यक्ष शरद गिरडे, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष गजानन गूळधे,ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे नागभीड महिला तालुका अध्यक्ष वेणूताई आंबोरकर भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले शहर अध्यक्ष बंटी वनकर सहकार आघाडी तालुका अध्यक्ष दत्तू पिसे कमलाकर लोणकर नगराध्यक्ष उमाजी हिरे , नप उपाध्यक्ष गणेश तर्वेकर नागभीड आदी उपस्थित होते.
आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की वर्षातून दोन संकल्प घेऊन परिपूर्ण करण्याचा संकल्प घेण्यासाठी महिलांचा आशीर्वाद घेत असतो. महिलांचे संरक्षण घेणे या महिला दिनी घ्यायची आहे. ७५ वर्ष स्वातंत्र्य दिन निमित्ताने रॅली काढली असता महाविकास आघाडी सरकारने गुन्हे दाखल केल्याचे सांगत मातृशक्ती च्या माध्यमातून मी दुसऱ्यांदा विजयी होत कांग्रेस चा इतिहास मोडीत मतदार संघाची सेवा करण्याची संधी मिळाली. शेती हंगाम व रोजगार हमी कामे सुरू असताना माझी बहिण हातातील काम सोडून सुद्धा महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याबद्दल उत्साहात होत आमदार बंटीभाऊ भांगडीया सांगत खरी संपत्ती मातृशक्ती असून ती टिकवून ठेवण्याची संकल्प करीत आहे. पक्षाचे तरुणांचे ,पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कोरोना काळात सहकार्य लाभले.कोरोना संकट काळात बंडूभाऊ नाकाडे, बकारामजी मालोदे, नितीन गभने हे आपल्याला सोडून गेले हे दुःख व्यक्त करीत भांगडीया परिवार सदैव आपल्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा चिमूर नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान थोर पुरुषाच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.ट्रान्सफर ग्रुप च्या वतीने ग्रुप डान्स करण्यात आले.दरम्यान गरजू विद्यार्थ्यांना सायकल तर गरजू महिलांना शिलाई मशीन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे कडून भेट देण्यात आली. गणेश महिला कबड्डी संघ शिवणपायली ला प्रथम बक्षीस, भाजप महिला आघाडी चमुस द्वितीय तर तृतीय मिनझरी चमुस रोख बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली.
संचालन शरयू शेरकुरे यांनी केले प्रास्ताविक माया ननावरे यांनी केले आभार यांनी व्यक्त केलेतालुक्यातील मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.भाजप ,भाजयुमो, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेत महिला मेळावा यशस्वी केला.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.